Menu Close

ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात हिंदू जनजागृती समिती तर्फे ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रवीणा पाटील यांनी मार्गदर्शन केले 

मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रवीणा पाटील

ठाणे – श्री सीरवी समाज युवक-युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम १४ जूनला ठाणे येथील श्री आई माताजी मंदिर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला समाजातील युवक-युवती, तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्या सौ. प्रवीणा पाटील यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी युवक-युवतींनी विवाह, मैत्री आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करतांना सतर्क रहाण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधून त्यांना योग्य संस्कार आणि मार्गदर्शन देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास १२० हून अधिक जण उपस्थित होते.

Latest News