व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय वारशाचा अवमान खपवून घेणार नाही – हिंदु जनजागृती समिती

मुंबई/नवी दिल्ली : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन पातळीवर विडंबन केल्याप्रकरणी ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ही नोटीस बजावली असून ॲमेझॉनने ४८ तासांत भारतीय जनतेची जाहीर माफी मागून ही वादग्रस्त जाहिरात तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ॲमेझॉन विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान या जाहिरातीमुळे देशभरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, सामाजिक माध्यमांवर ॲमेझॉन वर बहिष्काराची (#Boycott_Amazon) ऑनलाईन मोहीम प्रचंड वेगाने पसरत आहे.
🛑 LEGAL NOTICE,
To,
The Chief Executive Officer / Managing Directorhttps://t.co/an0kuix5ot, Inc. & Amazon Seller Services Private Limited (Amazon India)
Corporate Office:
8th Floor, World Trade Centre, Plot No. C-1, Sector 16,
Noida, Uttar Pradesh – 201301
Also to:
Amazon… pic.twitter.com/6QiuVJRGWS— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) June 12, 2026
या जाहिरातीत आर्यभट्ट यांच्या वेशातील एका व्यक्तीला उभे करून त्यांना ‘शून्य डिलिव्हरी चार्जेस शोधणारा शास्त्रज्ञ’ अशा उपरोधिक आणि विनोदी स्वरूपात सादर करण्यात आले आहे. ज्या थोर ऋषितुल्य शास्त्रज्ञाने जगाला ‘शून्याची’ अमूल्य संकल्पना दिली आणि भारताचा वैज्ञानिक ध्वज जगभरात फडकावला, त्यांना केवळ एका व्यावसायिक फायद्यासाठी ‘कॉर्पोरेट मस्कट’ (विनोदी व्यावसायिक पात्र) बनवून त्यांची क्रूर थट्टा उडवणे हा भारताच्या महान ज्ञान-वारशाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
Amazon Insults Aryabhata
Aryabhata gave the world ZERO.
Amazon gave him ZERO respect.Turning Bharat’s greatest mathematician into a marketing prop for “zero fees” is not creativity, it’s cultural insult.@amazonIN Apologise. Withdraw the ad. Respect India’s civilisational… pic.twitter.com/htr0HluRxi
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 12, 2026
व्यावसायिक फायद्यासाठी भारतीय संस्कृती आणि हिंदू प्रतीकांचा अवमान करण्याची ॲमेझॉनची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची चित्रे असलेले पायपुसणे, टॉयलेट सीट कव्हर्स विकणे, तसेच ‘तांडव’ वेबसिरीजच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तीव्र विरोधानंतर कंपनीला माफी मागावी लागली होती. केवळ व्यावसायिक लाभासाठी भारतीय राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे हे कृत्य सुधारित भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), कलम १९६ व १९७ (समाजात तेढ निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणे) आणि कलम ३०२ (धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) अन्वये थेट फौजदारी व दिवाणी कारवाईस पात्र ठरते, याकडे नोटिशीतून लक्ष वेधण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ॲमेझॉनला अटी पूर्ण करण्यासाठी ४८ तासांचा मुदत दिली आहे. त्यानुसार ही वादग्रस्त जाहिरात यु-ट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि टेलिव्हिजनसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कायमची हटवण्यात यावी; कंपनीने आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवर, वेबसाईटच्या मुख्य पानावर आणि देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीर व बिनशर्त माफी मागावी; तसेच भविष्यात राष्ट्रीय प्रतीकांचा वा राष्ट्रपुरुषांचा अवमान न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत या मागण्या पूर्ण न झाल्यास, न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा समितीच्या अॅड्. अमिता सचदेवा यांनी दिला आहे.


