-
मुंबईत ‘एस्.बी.आय.’च्या हिंदु महिला कर्मचार्याच्या धर्मांतराचा डाव उघड !
-
महिलेला बँकेतीलच साफिन गोडल या कर्मचार्याने ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवले
-
महिलेच्या पतीनेच पत्नी, तसेच लव्ह जिहादींच्या विरोधात तक्रार केल्यावर गुन्हा नोंद
-
लव्ह जिहादी साफिन गोडल आणि महंमद आदिल यांनी पतीला जिवे मारण्याच्या दिल्या धमक्या

मुंबई – नरिमन पॉईंटसारख्या उच्चभ्रू परिसरातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ‘बॅकबे रिक्लेमेशन’ येथील शाखेत इस्लामी धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे कार्यरत असलेल्या एका हिंदु महिला कर्मचार्याचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप तिच्या पतीनेच केला. पतीने पत्राद्वारे स्टेट बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश भारती यांच्याकडे तक्रार केली. तसेच पीडित पतीने राजस्थानमधील उदयपूरच्या सुखेर या त्याच्या मूळ गावी तक्रार केल्यावर राजस्थान पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ‘सनातन प्रभात’ने सुखेरचे पोलीस निरीक्षक भारत योगी यांच्याशी संवाद साधल्यावर हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिला, तसेच स्टेट बँकेतील कर्मचारी महंमद आदिल आणि सफिन गोडन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामुळे ‘टी.सी.एस्.’च्या कॉर्पोरेट जिहादसारखाच हा प्रकार असल्याचे आता म्हटले पाहिजे.
Safin Godal & Mohammad Adil brainwashed and pressured a Hindu woman for religious conversion in Udaipur, Rajasthan.
They threatened her repeatedly; she went missing with her 9-year-old daughter.
Hindu activists demands immediate police action and their arrest.@RajPoliceHelp pic.twitter.com/sFebCM9SHB
— Treeni (@treeni) May 27, 2026
पत्नीचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र असल्याचा पतीचा आरोप !
यासंदर्भात पीडित पतीने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले की,
१. गेल्या वर्षभरापासून पत्नीच्या वागण्यात अचानक विचित्र पालट दिसू लागला. ती इस्लाम धर्मातील चालीरितींचे पालन करू लागली. यासमवेत तिने इस्लामी ग्रंथांचे वाचन, रोजे (उपवास), तसेच इस्लामी पेहराव (हिजाब) आत्मसात करण्यास चालू केला.
२. साधारण २ महिन्यांपूर्वी तिने स्टेट बँकेतील कर्मचारी साफिन अब्दुलकदर गोडल याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे मला सांगितले. तिने ८ वर्षांच्या आमच्या मुलीसह इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचे मत व्यक्त केले होते.
३. घटनेची दाहकता पाहून मी ३० मार्चला दोघींना घेऊन राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यात असलेल्या सुखेर या मूळ गावी आलो.
४. तथापि १८ एप्रिलला साफिनने माझी पत्नी आणि मुलगी यांना पळवले. तेव्हापासून त्या दोघींचा काहीच पत्ता मिळालेला नाही. मला निश्चिती आहे की, माझ्या पत्नीवर प्रचंड दबाव आहे.
५. याआधी वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीतही महंमद आदिल या स्टेट बँकेच्याच कर्मचार्याने तिची आर्थिक फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्या वेळी ती गरोदरही राहिली होती. नंतर मी तिचा गर्भपात करवून घेतला.
६. हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे आदिल आणि साफिन यांचे मोठे षड्यंत्र आहे, असे मला वाटते. दोघे कोणत्यातरी मोठ्या इस्लामी संघटनेशी जोडलेले असू शकतात.
७. मला सध्या मुंबईत नोकरीसाठीही जाणे शक्य नाही. महंमद आणि साफिन या दोघांनी मला अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
‘आस्थापनांतील मुसलमान कर्मचार्यांपासून हिंदु महिला कर्मचार्यांनी चार हात दूर राहिले पाहिजे’, असे टोकाचे आवाहन कुणी केले, तर त्यात चुकले कुठे ? — संपादक, हिंदू जनजागृति समिति
हिंदूंचे सर्रास धर्मांतर केले जाते, याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभावच कारणीभूत आहे ! अशा प्रकारे कधी कुणा मुसलमान महिला कर्मचार्यांच्या संदर्भात होते का ?, याचा हिंदूंनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे ! — संपादक, हिंदू जनजागृति समिति


