राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त विंग (ता. खंडाळा) येथे विराट हिंदु संमेलन उत्साहात साजरे !

विंग (ता. खंडाळा) – आजच्या काळात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हिंदु धर्मावर वेगवेगळ्या जिहादच्या माध्यमातून होणारे आघात आणि घटना देशभरात अजूनही होत आहेत. धर्माचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनो धर्माभिमान जागृत करा आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले.
📍PUNE | @RSSorg च्या शताब्दी निमित्त ग्रामस्थ तरुण मंडळ आणि हिंदू संमेलन समिती (विंग) आयोजित विराट हिंदू संमेलन ! ⛳
🎤 हिंदूंनो, धर्माभिमान जागृत करा आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – @Krantipetkar1, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती (@HinduJagrutiOrg) pic.twitter.com/5zjWeSZ9hI
— Parag Gokhale (@Parag_hjs) June 3, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ३१ मे २०२६ या दिवशी खंडाळा तालुक्यातील विंग येथे ‘ग्रामस्थ तरुण मंडळ’ आणि ‘हिंदु संमेलन समिती’ यांच्या वतीने विराट हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले. प.पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी हिंदूंनी जातिभेद विसरून संघटित होण्याचा संदेश दिला, तर सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित कुलकर्णी यांनी संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रकर्तव्याच्या जाणीवेवर मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन श्री. जितेंद्र मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महांगरे यांनी केले. या संमेलनाला २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.


