Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक – कुमार चेलप्पन

श्री. कुमार चेल्लपन यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे इंग्रजी भाषेतील दिव्य संक्षिप्त चरित्र’ भेट देतांना श्री. श्रीराम लुकतुके

कोचीन (केरळम्) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ धर्माभिमानी पत्रकार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे लेखक श्री. कुमार चेलप्पन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. कोचीन येथील ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयात ही भेट झाली. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री श्रीराम लुकतुके आणि नंदकुमार कैमल उपस्थित होते. याप्रसंगी श्री. चेलप्पन यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे इंग्रजी भाषेतील दिव्य संक्षिप्त चरित्र’ भेट देण्यात आले. ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचायला हवे’, अशी भावना श्री. चेलप्पन यांनी या वेळी व्यक्त केली.

याप्रसंगी श्री. कुमार चेलप्पन यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्री. श्रीराम लुकतुके यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे समितीच्या वतीने भारतभर चालणारे धर्मजागृतीचे प्रयत्न, ‘लव्ह जिहाद’विरोधी अभियान आणि राष्ट्र-धर्मरक्षणार्थ चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली, तसेच मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांचे रक्षण आणि सुव्यवस्था यांसाठी होत असलेल्या संघटित प्रयत्नांची माहितीही सांगण्यात आली. या हृद्य भेटीच्या वेळी ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीचे मालक आणि मुख्य संपादक श्री. सुनील वडयार हेही उपस्थित होते.

Latest News