२ दिवसांत कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याची चेतावणी
फोंडा आणि म्हापसा या शहरांमध्ये तक्रारी प्रविष्ट

फोंडा (गोवा) – गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरचा कथित अवमान केल्याचा संदर्भ घेत काही ख्रिस्ती हिंदु देवतांवर अश्लील टिपणी करत आहेत. अशा लोकांविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अन्यथा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलिसांना दिली आहे. २३ एप्रिल या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी फोंडा आणि म्हापसा येथील पोलीस ठाण्यांत तक्रार दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गोवा पुलिस का दोहरा रवैया क्यों?
भगवान श्रीराम का अपमान करने वालों पर भी कार्रवाई होनी चाहिए।
Arrest Lord Rama Abusers#StopSelectiveAction_GoaPolice@HinduJagrutiOrg pic.twitter.com/FMGCCjKfaJ— Satyavijay Naik (@naik_satya77414) April 25, 2026
याविषयी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘गौतम खट्टर यांनी जे काही वक्तव्य केले, त्याचे आम्ही समर्थन करत नाही; मात्र त्याचा संदर्भ घेत आज सामाजिक माध्यमांवर हिंदु देवतांवर अश्लील टिपणी करण्यात येत आहे. ज्या प्रकारे इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, त्याचप्रमाणे आमच्या धर्मभावनासुद्धा दुखावल्या जात आहेत, याची सरकारने नोंद घ्यावी.
Justice should not depend on community pressure.
Act fairly and impartially.
Arrest Lord Rama Abusers#StopSelectiveAction_GoaPolice@goanewshub @InGoa24x7 @ANI @SG_HJS @HinduJagrutiOrg pic.twitter.com/c7XzrzulEu— Satyavijay Naik (@naik_satya77414) April 25, 2026
निवेदनानंतर ३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
After sustained complaints at Ponda and Mapusa by the Hindu Janajagruti Samiti, Goa Police have finally filed an FIR against 3 individuals for making offensive, derogatory and deeply hurtful remarks against our revered deities, Prabhu Shri Ram and Mata Sita. 🚩
Action has begun… pic.twitter.com/3OadttVhjO
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 26, 2026
गौतम खट्टर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या भावाला अटक झाली आहे. तोच संदर्भ घेत आज विदेशात बसून जे कुणी सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांवर अश्लील टिपणी करत आहेत, त्यांच्या नातलगांना अटक करावी. २ दिवसांत कारवाई न झाल्यास फोंडा पोलीस ठाण्यात लोक एकत्र येतील, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठांनी दिली आहे. गोरक्षक अणि हिंदुत्वनिष्ठ श्री. राजीव झा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गौतम खट्टर यांना २४ घंट्यांत अटक केली जाईल, असे सांगितले होते. आता ज्या वेळी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत, त्या वेळीसुद्धा त्यांनी २४ घंट्यांच्या आत या लोकांना पकडण्याचे काम करावे. हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्यांनी आधी पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांची भेट घेतली आणि नंतर पोलीस अधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्याशी चर्चा करून संबंधितांबर कारवाई करण्याची मागणी केली.







