Menu Close

‘लव्ह जिहाद’च्या पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान राबवणार

पुणे – राज्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकारांमध्ये बळी पडणार्‍या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान चालू करण्याची घोेषणा राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी ८ एप्रिल या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या अभियानाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती, समुपदेशन, पुनर्वसन, तसेच पीडितांना साहाय्य केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठीचा ‘हेल्पलाईन’ (साहाय्यता) क्रमांक घोषित करण्यात येईल. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल.

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी मांडलेली सूत्रे

१. हिंदु धर्मात परतलेली सायली सुर्वे हिच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुष्कळ गंभीर होत आहे. तिचा पती आतिफ तासे याच्यावर २८ गुन्हे नोंद आहेत.

२. सायलीच्या सासू गुलशन तासे यांच्यावर अनेक गुन्हे नोंद असून तिच्या ४ सुना हिंदु असून त्यांपैकी काहींनी तक्रारही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

३. सायलीला पतीपासून मुक्तता हवी असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात मानसिक दडपण आहे. तिच्या ४ मुलांसह आई-वडिलांच्या जिवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

४. सायली सुर्वे हिने घरवापसी केल्यानंतर तिला पोलीस संरक्षण देण्यात न आल्याचा आरोप करत ‘हे दायित्व नेमके कुणाचे?’, असाही प्रश्न उपस्थित केला.

५. सायलीला स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते, तर तिच्या सासरच्या लोकांनी पुन्हा बळजोरीने नेण्याचा प्रकार घडला नसता. सायलीने दबावाखाली पोलीस ठाण्यात दिलेल्या उत्तराचा (जबाब) पोलिसांनी गंभीरपणे विचार करावा.

पोलीस ठाण्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ विभाग चालू करावा

पोलीस ठाण्यांमध्ये ‘भरोसा विभाग’प्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ विभाग स्थापन करावा. म्हणजे ‘लव्ह जिहाद’च्या घटना किती मोठ्या प्रमाणात घडतात, हे समजेल, तसेच कुणावरही बळजोरीने धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जाणार नाही, असा धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्र सरकारने केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Latest News