- बंदी असूनही या उत्पादनांचा काळाबाजार कसा चालू आहे ?
- पाकिस्तानातून ही उत्पादने भारतात येतातच कशी ? – संपादक, हिंदुजागृती

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) – येथे विविध दुकानांमध्ये पोलिसांनी घातलेल्या धाडीत बंदी असलेल्या ‘मल्लिका’, ‘झलक’, ‘गोरे’, ‘गोल्डन पर्ल’, ‘चांदणी’, ‘उजूबा’, ‘फेस फ्रेश’, ‘नूर हर्बल’, ‘न्यू फेस ब्युटी क्रीम’ यांसह विविध पाकिस्तानी क्रीम जप्त करण्यात आली. गोरे होण्यासाठी वापरल्या जाणार्या या सौंदर्यप्रसाधनांमुळे त्वचा, तसेच थेट मूत्रपिंडावर (‘किडनी’वर) परिणाम होत असल्याचे तज्ञ आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे. ‘पारले गोल्ड’, ‘गोरे साबण’ आणि ‘मल्लिका व्हिटॅमिन सी सिरम’ यांचाही जप्त केलेल्या उत्पादनांत समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा छापा; पाकिस्तानमधून प्रतिबंधित कॉस्मेटिक्स जप्त! | SAMBHAJI NAGAR
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या प्रतिबंधित कॉस्मेटिक्सची विक्री करणाऱ्या तीन दुकांनांवर छापा टाकला. हायलाईट कलेक्शन, ओम ट्रेडर्स आणि फलक इम्पोरियम… pic.twitter.com/tA0d7l2aNo
— Sudarshan मराठी (@SudarshanNewsMH) March 30, 2026

येथील सिटी चौक येथे पोलिसांनी घातलेल्या धाडीत ६० सहस्र रुपयांची क्रीम, साबण, सिरम जप्त केले आहे. बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांची विक्री चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील दुकानांवर कारवाई केली. ‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला. प्रसाधनांच्या संदर्भात युवकांनी आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी दिल्या होत्या.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात