Menu Close

सातारा येथील ‘इनरव्हील क्लब’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांचा सत्कार

सौ. रूपा महाडिक

सातारा (महाराष्ट्र) – येथील ‘इनरव्हील क्लब’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांच्या नि:स्वार्थ व्यापक सामाजिक कार्याची नोंद घेऊन सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. गोवा येथे शिबिरासाठी गेल्याने सौ. रूपा महाडिक हा सत्कार स्वीकारण्यासाठी अनुपस्थित होत्या. त्यांच्या वतीने त्यांचे यजमान डॉ. सुनील महाडिक यांनी सत्कार स्वीकारला.

सत्कार ‘श्री गुरुचरणी अर्पण’ ! – सौ. रूपा महाडिक

पुरस्काराविषयी सौ. रूपा महाडिक म्हणाल्या, ‘‘मला सामाजिक कार्याची प्रेरणा माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यामुळेच मिळते. हा सत्कार मी त्यांच्या चरणी अर्पण करते. या सामाजिक कार्यात माझे यजमान आणि माझ्या सहकारी यांचेही मला अमूल्य सहकार्य लाभते. माझ्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड करणार्‍या ‘इनरव्हील क्लब’च्या अध्यक्षा ऐश्वर्या पाटील आणि सचिव स्नेहल भट्टड यांचे मी आभार व्यक्त करते.’’

Latest News