हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने ‘गुढीपाडव्या’विषयी प्रवचने, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन !
पुणे

गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाचा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ, आळंदेवाडी, केंजळ, पारगाव (सालू-मालू), श्री शिरसाईमाता मंदिर गोकवडी, पौड, मोई गाव, उर्से, श्री राधाकृष्ण मंदिर, तुकाईटेकडी, काळेपडळ, हडपसर, आढे मावळ आदी अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने, ‘सामूहिक गुढीपूजन’ करण्यात आले.

या वेळी श्री राधाकृष्ण मंदिर, तुकाई टेकडी, काळेपडळ, हडपसर येथे सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीकडून पुणे जिल्ह्यातील शाळा, सोसायटी, तसेच मंदिरांमध्ये गुढीपाडव्याविषयी प्रवचन घेण्यात आले. या वेळी ‘गुढी कशी उभारावी ?’ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले. ठिकठिकाणी फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये स्थानिक नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले.
सोलापूर
हिंदु नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडव्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत एकूण १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले. या उपक्रमामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.

गुढीपूजन झालेली प्रमुख ठिकाणे – मल्लिकार्जुन मंदिर, दमाणीनगर येथील श्री गणेश मंदिर परिसर, श्री गणपति मंदिर (रामदेवनगर, शेळगी), विणकर वसाहत (गांधीनगर), अशोक चौक येथील व्यंकटेश मंदिर, सिद्धगणेश हनुमान मंदिर (७० फूट रोड), नीलमनगर येथील भारतीय एकात्मता नवरात्र महोत्सव मंडळ, जुना घरकुल येथील श्री दत्त मंदिर, ब्रह्मनाथनगर, वैष्णव मारुति मंदिर (जुना घरकुल), रुद्र मारुति मंदिर, नवीन घरकुल एस् पॉईंट, नवीन घरकुल, पोषमा मंदिर (विनायकनगर), अक्कलकोट येथील रामगल्ली, तसेच अन्य स्थानिक भाग.

या १५ ठिकाणी ब्रह्मध्वज पूजन, प्रभु श्रीरामाची आरती, नामजप आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. अनेक ठिकाणी प्रथमच सामूहिक गुढी उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. जुना घरकुल (डी-२ ग्रुप) येथील श्री दत्त मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करत ब्रह्मध्वज पूजन, श्रीरामाची आरती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली. या वेळी श्री. यश मुगड्याल, कु. शिवलीला गुब्याड, तसेच ‘स्वरांजली न्यूज चॅनल’चे निवेदक श्री. गिरीश गोसकी उपस्थित होते. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या युवतींनी पुढाकार घेतला असून उपस्थितांनी उत्साहात जयघोष करत धर्मरक्षणासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प केला. ‘सण-उत्सव शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरे केल्यास समाजात संघभाव, प्रेमभाव आणि एकात्मता वाढते’, असा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.
अकोला

बुलढाणा








