Menu Close

रायपाटण (रत्नागिरी) : शिवजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित प्रेरणादायी व्याख्यान

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा निश्चय करा ! – श्री. दामोदर लिंगायत, हिंदु जनजागृती समिती

रायपाटण (राजापूर) – हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी मावळ्यांप्रमाणे योगदान देण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा निश्चय करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दामोदर लिंगायत यांनी केले. श्री. लिंगायत होळीचा मांड, रायपाटण येथे तिथीनुसार नुकत्याच साजर्‍या झालेल्या शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याकडून हिंदु राष्ट्राकडे’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

श्री. लिंगायत पुढे म्हणाले की, ज्यांची हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी समितीच्या वतीने आरंभी धर्मशिक्षण वर्ग किंवा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आपल्या भागातील अशाप्रकारे साप्ताहिक वर्ग चालू करायचे असतील, तर आम्हाला अवश्य सांगा. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक श्री. विनोद करंदीकर यांनी प्रस्तावना करतांना शिवकार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

Latest News