Menu Close

‘द केरल स्टोरी-२’ चित्रपट महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

मुंबई – ‘महाराष्ट्रात सध्या ‘स्वतंत्र करमणूक कर’ अस्तित्वात नाही, तर ‘स्टेट जी.एस्.टी’ (राज्य वस्तू आणि सेवा कर) लागू आहे. हा करमुक्त केल्यास त्याची प्रतिपूर्ती सरकारला करावी लागते, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या विषयात आम्ही जातीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करत आहोत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या छुप्या आक्रमणांपासून तरुण मुलींना वाचवण्यासाठी ‘द केरल स्टोरी – २’ हा प्रबोधनात्मक चित्रपट राज्यात तात्काळ ‘करमुक्त’ करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, ‘द केरल स्टोरी – २’ हा चित्रपट केवळ मनोरंजनात्मक नसून तरुण हिंदु मुलींची होणारी फसवणूक आणि त्यामागील धोके यांवर प्रकाश टाकणारी एक सतर्क मोहीम आहे. यापूर्वी ‘द केरल स्टोरी – १’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे ‘द केरल स्टोरी – २’ हा चित्रपट करमुक्त केल्यास तिकिटाचे शुल्क अल्प होतील. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील पालक अन् मुली हा चित्रपट पाहून सतर्क होऊ शकतील. केवळ मंत्रीमंडळाच्या मान्यतेवर न थांबता ‘विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा त्वरित संमत करावा’, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Latest News