Menu Close

मंदिरांचा ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करावा, ‘सनर्बन’वर बंदी आणावी आणि मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे !

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन !

(‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा म्हणजे मंदिरांच्या भूमी अनधिकृरित्या कह्यात घेण्याच्या विरोधातील कायदा)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतांना श्री. सुनील घनवट

नागपूर – येथील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याविषयी, मुंबईत १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोळके उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही निवेदनांचा विषय समजावून घेतला, तसेच पुढील कार्यवाहीसाठी निवेदन सचिवांना पाठवून दिले.

देवस्थानाच्या सहस्रो एकर शेतभूमी भूमाफियांनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा तात्काळ लागू करण्याविषयी, तसेच विशेष अन्वेषण पथके (एस्.आय.टी.) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Latest News