Menu Close

ऐतिहासिक ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीची आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे मागणी

पणजी – जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ ही जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराची साक्ष देणारी एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचे पावित्र्य अबाधित ठेवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार राजेश फळदेसाई यांनी ‘हातकातरो खांबा’चे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी लगेच ‘हातकातरो खांबा’च्या कठड्याच्या सभोवताली कुंपण बांधणार असल्याचे समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये समितीचे राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, श्री. सुचेंद्र अग्नी,  श्री. स्वप्नील नाईक आदींचा समावेश होता.

‘हातकातरो खांबा’ची जागा ही सध्या कामगार लोकांचे आश्रयस्थान झालेली आहे. या खांबाच्या कठड्यावर कामगार झोपतात आणि तेथे बसून दारू पितात, असे संतापजनक चित्र त्या ठिकाणी पहायला मिळते. हल्लीच या खांबाला पिवळा रंग देऊन या ऐतिहासिक खांबाची विटंबना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ही मागणी केली आहे.

Latest News