-
रेल्वेमंत्री आणि पर्यटन विभाग यांच्याकडे मागणी
-
खाद्य सेवा पुरवणार्या आस्थापनावर बंदी घालूनही आस्थापनाचे कामकाज चालू

मुंबई – ‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ या आस्थापनावर ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (‘आय.आर्.सी.टी.सी.’ने) २६ मार्च २०२४ ते २५ मार्च २०२७ या कालावधीसाठी बंदी घातली आहे. तरीही हे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’चे नियम आणि ग्राहक हक्क धोरण यांचे उल्लंघन करून केटरिंग सेवा (खाद्य पुरवण्याची सेवा) चालवत असल्याचा विश्वसनीय अहवाल आणि प्रवाशांच्या तक्रारी यांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची तात्काळ नोंद घेऊन बंदी घालण्यात आलेले आस्थापन ‘अरेन्को केटरिंग’वर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि ‘आय.आर्.सी.टी.सी.’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजयकुमार जैन यांच्याकडे केली आहे.
#IRCTC #IndianRailways #WATCH #MannKiBaat
▫️PM Narendra Modi Ji, @narendramodi
▫️Shri Ashwini Vaishnaw Ji @AshwiniVaishnaw
▫️Shri Sanjay Kumar Jain, CMD/@IRCTCofficial
▫️Shri Pralhad Joshi Ji @JoshiPralhadSubject: Request for Clarification and Action
Regarding the… pic.twitter.com/gaINCVps0R— Surajya Abhiyan (@SurajyaCampaign) May 25, 2025
सुराज्य अभियानाने उपस्थित केलेली सूत्रे –
१. बंदी घालण्यात येऊनही ‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ अजूनही रेल्वेगाड्यांमध्ये सेवा देत असल्याचे वृत्त आहे. हे आस्थापन सध्या ‘आय.आर्.सी.टी.सी.’ किंवा झोनल रेल्वे अधिकारक्षेत्र यांच्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे गटात समाविष्ट आहे कि नाही, हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.
२. कॅगच्या अहवालानुसार ‘आय.आर्.सी.टी.सी.’ने ‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ला ६२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांतील ५४ लाख रुपये भरण्यात आले नाही. अशा थकबाकीदारासोबतचे करार रहित करण्याची आवश्यकता असतांना या आस्थापनाला दक्षिण रेल्वेने ११ आणि ‘आय.आर्.सी.टी.सी.’ने ७ कंत्राटे दिली आहेत.
३. वरील विषय लक्षात घेता, तसेच दोषी आस्थापन आणि सहभागी अधिकारी यांच्याविरुद्ध संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई चालू करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानने केली आहे.







