वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरिचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
विघ्नहरणासाठी करावयाची श्रीगणेशाची प्रार्थना
श्रीविष्णूचे स्मरण करण्याचा श्लोक
भगवान श्रीकृष्णाचा प्रार्थनास्वरूप श्लोक
श्री देवीचा श्लोक
भगवान शिवाची प्रार्थना
सूर्यमंत्र