भगवान श्रीकृष्णाचा प्रार्थनास्वरूप श्‍लोक

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥

अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला, सर्व दुःखे हरण करणार्‍या परमात्म्याला आणि शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला माझा नमस्कार असो.

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।

अर्थ : वसुदेवाचा पुत्र; तसेच कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्‍या, देवकीला परमानंद देणार्‍या आणि संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणार्‍या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

Leave a Comment