श्लोक

सदा सर्वदा योग तुझा घडावा,

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षु नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आता
नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानराज भगवंत
योगिराज भगवंत
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
उडाला उडाला कपि तो उडाला
समुद्र उलटोनी लंकेशी गेला
लंकेशी जाऊनी चमत्कार केला
नमस्कार माझा त्या मारूतीला