व्यास ऋषींसंदर्भातील श्लोक

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धेफुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितोज्ञानमयप्रदीपः।।

अर्थ : महाभारतरूपी तेलाने संपृक्त असा ज्ञानमय दीप प्रज्वलित करणार्‍या विशालबुद्धी व्यासऋषींना माझा नमस्कार असो.
व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेःपौत्रमकल्मषम् ।
पराशरात्मजं वन्दे शुकतातंतपोनिधिम्।।
अर्थ : जे वसिष्ठ ऋषींचे पणतू, शक्ति ऋषींचे नातू, पराशर ऋषींचे पुत्र, आणि शुकऋषींचे वडील आहेत, त्या निष्कलंक, तपोनिधी व्यासांनामी नमस्कार करतो.
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपायविष्णवे ।
नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमोनम:।।
अर्थ : विष्णुरूप व्यास अथवा व्यासरूप विष्णूला मी नमस्कार करतो. वसिष्ठवंशज ब्रह्मनिधी व्यासांना नमस्कार असो.
अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरि: ।
अभाललोचन: शम्भुः भगवान् बादरायण: ।।
अर्थ : भगवान वेदव्यास चार मुखे नसतांनाही ब्रह्मदेवस्वरूप आहेत. दोन बाहू धारण केलेले भगवान विष्णु आहेत आणि ललाटी तृतीय नेत्र नसूनही शिवरूप आहेत.
मुनिं स्निग्धाम्बुजाभासंवेदव्यासमकल्मषम् ।
वेदव्यासं सरस्वत्यावासं व्यासंनमाम्यहम् ।।
अर्थ : नयनरम्य कमळाप्रमाणे कलंकरहित, सरस्वतीचे माहेरघर अशा भगवान वेदव्यासांना मी अभिवादन करतो.
ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासोमहामुनिः ।
अर्थ : सहस्रावधी ऋषींमध्ये वेदव्यासांना महामुनींचे स्थान आहे.
व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।
अर्थ : संपूर्ण जगातील अध्यात्मविषयक ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.
वेदव्यासं स्वात्मरूपं सत्यसन्धंपरायणम् ।
शान्तं जितेन्द्रियक्रोधं सशिष्यंप्रणमाम्यहम् ।।
अर्थ : आत्मस्वरूप, सत्यशील, तत्पर, शांत, जितेंद्रिय आणि प्रेमळ अशा व्यासांना आणि त्यांच्या शिष्यांना मी प्रणाम करतो.
पाराशर्यं परमपुरुषं विश्वदेवैकयोनिं
विद्यावन्तं विपुलमतिदं वेदवेदाङ्गवेद्यम् ।
शश्वच्छान्तं शमितविषयं शुद्धतेजो विशालं
वेदव्यासं विगतशमलं सर्वदाऽहं नमामि ।।
अर्थ : पराशरपुत्र, परमपुरुष, विश्व आणि देवतांच्या ज्ञानाचे उत्पत्तीस्थान, विद्यावान, विपुल बुद्धी देणारे, वेद आणि वेदांग जाणणारे,
चिरंजीव, शांत, विषयांवर विजय मिळवलेल्या, शुद्ध तेजाने युक्त, विभू,अविद्यारहित अशा भगवान वेदव्यासांना मी सर्वदा शरण आलो
आहे.
श्रवणाञ्जलिपुटपेयंविरचितवान्भारताख्यममृतं यः ।
तमहमरागमकृष्णं कृष्णद्वैपायनं वन्दे ।।
अर्थ : ज्यांनी जणु कानांची ओंजळी करून पिण्यासारखे महाभारत नावाचे अमृत निर्मिले त्या अनासक्त,निष्कलंक अशा कृष्णद्वैपायनव्यासांना मी नमस्कार करतो.