संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळची प्रार्थना


शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।

शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते ॥१॥

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।

दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥२॥

दिव्या दिव्या दीपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।

दिव्याला पाहून नमस्कार ॥३॥

तिळाचे तेल कापसाची वात ।

दिवा तेऊ दे सारी रात ।

दिवा लागला तुळशीपाशी ।

उजेड पडला विष्णूपाशी ।

माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ॥४॥