जलप्रदूषण म्हणजे नद्यांवरील अत्याचार !

१. पवित्र नदीचे नाल्यात केलेले रूपांतर

दिल्लीला खेटून वहाणार्‍या यमुना नदीवर या नगराने अक्षरशः अत्याचार चालवले आहेत. नगरातील पूर्ण ५७ प्रतिशत, म्हणजेच प्रतिदिन ३ अब्ज लीटर दूषित पाणी नदीत सोडले जाते. केवळ एका घंट्यात २४ जणांनी लोकनायक सेतू या नवीन पुलावरून निर्माल्यासह अनेक सटरफटर वस्तू नदीत टाकल्या, तर एका पंचतारांकित उपहारगृहामध्ये (हॉटेलमध्ये) उरलेले, तसेच ग्राहकांचे उष्टे अन्न एका बंद ‘पॅजो’ रिक्शामधून आणून ते निर्लज्जपणे पुलावरून यमुनेत टाकून देण्यात आले, असे स्थानिक लोकांनी सांगितले.

२. नदीचे कचराकुंडीत रूपांतर करणारी कृतघ्न जनता !

प्लास्टिक कचर्‍याचा तर यमुनेचा पात्रात अक्षरशः खच पडलेला दिसतो. नदीच्या काठावर थोड्या दूर अंतरावर जमा केलेला कचर्‍याचा ढीग पाहिला, तर डोळे विस्फारतात. त्यात पाण्याच्या बाटल्यांचा मोठा समावेश दिसून आला. त्या विक्रीसाठी गोळा करून उपजीविका करण्याचा मोठा उद्योग येथे चालतो.

३. जगप्रसिद्ध वास्तूची केलेली विटंबना

आग्रा येथे ताजमहालाच्या जवळून वहाणार्‍या यमुनेचे फेसाळलेले आणि काळेशार, दुर्गंधी सुटलेले पाणी, ताजच्या मागील बाजूला साचलेली घाण अन् कचरा उबग आणणारा होता. यंदा यमुनेला आलेल्या पुरामुळे ताजमहालसमोर पलीकडच्या काठावर भलामोठा कचरा अडकून बसला होता. त्यामुळे सारा परिसर विद्रुप झालेला होता. पर्यटनाचा ऋतू (हंगाम) चालू असतांनाही त्याची स्वच्छता झालेली नव्हती.

४. कानपूरमध्ये सर्वांत जास्त गंगेचे प्रदूषण होते.

– शिवाजी निकुंभ, जळगाव. (संदर्भ : दैनिक लोकमत, १.४.२०११)