कचरा

१. ‘औद्योगिकीकरण संपुष्टात आणा, अन्यथा तेच तुम्हाला संपवून टाकील. संपूर्ण मानवच नष्ट करून टाकील; कारण जगातील प्रचंड राक्षसी कारखान्यातून जितके प्रचंड उत्पादन होते, तितकाच विषारी घातक कचराही निर्माण होतो.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

२.पर्यावरणातील कचर्‍यामुळे रीन आणि शिसे यांच्या धातूकणांचे भूमीखालील आणि भूमीवरील पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया अतीजलद होते. ब्रोमिनेटेड डायॉक्सिन, बेरिलिअम, कॅडमिअम आणि पारा उत्सर्जित करणार्‍या नलिकांमुळे सोन्याचे आवरण असणार्‍या वस्तूंवरील नायट्रिक आणि हायड्रोक्लोरिक आम्लांच्या वापरामुळे उत्सर्जित होणार्‍या कणांचा डोळे आणि त्वचा यांच्याशी संपर्क झाल्यास त्याचा परिणाम सततच्या आजारात होऊ शकतो.

३.क्लोरीन आणि सल्फर डायॉक्साईड यांसारख्या घातक आणि विषारीवायूरूप आम्लांच्या श्वसनाने श्वासोच्छ्वासाला त्रास होऊन अनेक आजारांना निमंत्रण देतात.

४. संगणकापासून निर्माण झालेला कचरा ही आधुनिक विज्ञानाची आणखी एक ‘देणगी’ आहे.

५. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित निर्माण होणार्‍या इंजेक्शन, औषधे, इतर कचरा ही समस्या फार मोठी आहे; कारण त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात हेळसांड झाल्यास इतरांना त्याची बाधा होऊ शकते.

६. प्रगत आणि प्रगतीशील देशांत अणूशक्तीच्या कचर्‍याचे फार मोठे आवाहन आहे. यामध्ये झालेली छोटी चूक सृष्टीवर भयावह परिणाम करू शकते !