पर्यावरणाची हानी कशामुळे ?


भांडवलशाहीने केली पर्यावरणाची शब्दातीत हानी !

भांडवलशाहीने केलेली पर्यावरणाची शब्दातीत हानी कधीही न भरून येणारी आहे. पोन यू हा चिनी तज्ञ सांगतो, ‘युरोपने गेल्या शतकात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जेवढा नाश केला, तेवढा विनाश आम्ही तीन दशकांत केला.

अ. मानवाला ३ कोटी ८० लक्ष वर्षे साठवून ठेवलेले नैसर्गिक भांडवल वापरायला मिळालेले आहे. जर सध्याच्या गतीने त्याचा वापर होत राहिला, तर या शतकाच्या अखेरीस त्यांतील फार थोडे शिल्लक राहील.

आ. गेल्या शतकातील उत्तरार्धात जगाने आपल्या जमिनीवरील एक चतुर्थांश मातीचे आवरण (मृदावरण किंवा टॉपसॉईल) आणि एक तृतीयांश इतके जंगल-आवरण (फॉरेस्ट कव्हर) घालवलेले आहे.
इ. गेल्या शतकातील शेवटच्या तीन दशकांतच पृथ्वीवरील एक तृतीयांश नैसर्गिक साधनसंपत्ती संपवून टाकण्यात आलेली आहे.

ई. १ सहस्त्र कोटी रुपये खर्चूनसुद्धा आठ जणांसाठीचा प्राणवायू माणूस निर्माण करू शकत नाही आणि तोच प्राणवायू पृथ्वी किंवा हे पर्यावरण ६०० कोटींना मोफत देते ! – डॉ. दुर्गेश सामंत, गोवा.
विज्ञानामुळे झालेल्या नैतिक प्रदूषणामुळे जागतिक पर्यावरण धोक्यात !
‘नोबेल पारितोषिक विजेते अर्नेस्य यांनी नवी दिल्ली येथे ३१.१.२००३ या दिवशी झालेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ‘संशोधन आणि शिक्षण या पलीकडील आपली सामाजिक कर्तव्ये’ याविषयी बोलतांना सांगितले, ‘मुक्त अर्थव्यवस्थेत सध्या केवळ मूल्यांना नव्हे, तर केवळ नफ्यालाच महत्त्व आल्याने नैतिक प्रदूषण निर्माण झाले आहे. नैतिक प्रदूषण इतके मोठे आहे की, या अधःपातामुळे समाजाचा निसर्गाविषयीचा निष्काळजीपणा वाढला असून त्यातूनच जागतिक पर्यावरण धोक्यात आले आहे.’ – प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन)
निसर्गावर मानव अत्याचार करील, तर निसर्गही त्याचा बदला घेईल !
‘निसर्गावर मानव अत्याचार करील, तर निसर्गही त्याचा बदला घेईल ! उर्जेची टंचाई, अनावर्षण, दुष्काळ, वांशिक संघर्ष, नैतिक अधःपात, भीषण रोगांचा प्रादुर्भाव आणि अखेरीस महायुद्ध ! पाऊस कसा येईल ? मेघ अंतराळात दाटतात आणि बरसतात, ते वृक्षांकरता ! डॉलर्सवर प्रेम करणार्‍या निर्घृण मानवांकरता कसा आणि का मेघ बरसेल ? कर्मविपाक वा कर्मनियम व्यष्टी, समष्टी आणि अखिल विश्व नियंत्रित करतो, तो नियम सर्वत्र अव्याहत, निराबाध आहे !’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (आदित्य कथा संवाद)
मानवाच्या अत्यंत स्वार्थीपणाने भगवंताने संरक्षण दिलेल्या पृथ्वीलाही धोका पोहोचणे !
पृथ्वी हीसुद्धा देह आणि क्षेत्र आहे, असे समजल्यास निसग नियमाप्रमाणे त्याच्या प्रमाणात पृथ्वीवर पंचमहाभूताचे आवरण आहे. तसेच तिच्या आतही आहे. पृथ्वीवरील सजीव प्राण्यांना पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील घातक नीलवर्ण सूर्यप्रकाशाचा, तसेच इतर घातक घटकांचा परिणाम होऊ नये; म्हणून पृथ्वीच्या वर १५ ते ५० कि.मी. अंतरावर ओझोन वायूचे आवरण दिले आहे; परंतु मानवाने विकृत मानसिक विचारधारणेतून निर्माण केलेल्या विविध वस्तूंमुळे निर्माण झालेल्या विघातक वायूमुळे ओझोन वायूच्या थराला कमकुवत करून टाकत आहे आणि त्यामुळे त्या थराच्या बाहेरील विघातक घटक आत प्रवेश करत आहेत.
मनुष्याच्या वाढत्या पापामुळेच प्रदूषणाची समस्या भेडसावत असणे !
हे सर्व आज आधुनिकतेच्या प्रभावाखाली आल्यामुळे होत आहे. आज प्रत्येक माणसातील विषय वासनांच्या अत्यंतिक प्रभावामुळे आणि सत्यत्वाचे ज्ञान नसल्यामुळे मानवी जीवनात नको त्या विकृती जन्म घेत आहेत. त्यांनाच ‘पाप’ म्हणतात. आज हे पाप इतके वाढले आहे, की या विकृतीमुळे स्वतः मानवाने आपले शरीर दूषित करून घेतले आहे. बाहेरील वातावरणात त्याच्या विचारामुळे निर्माण झालेल्या परिपाकामुळे सर्वत्रची हवा आणि पाणी दूषित झाले आहे; म्हणून आज प्रदूषणाची समस्या सर्वांना प्रामुख्याने भेडसावत आहे. हे सर्व आपल्यातील विकृतीमुळेच झाले आहे. मानवाला जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, सात्त्विक आहार, स्थळकाळाप्रमाणे तेथील वातावरणाप्रमाणे वेशभूषेची आणि घराची आवश्यकता आहे; परंतु आपल्यातील सुखाच्या विकृत समजापायी आपणच स्वतःचा नाश करत आहोत, हे त्याच्या लक्षातच येत नाही. यासाठी आपले राहणीमान निसर्ग नियमाप्रमाणे ठेवले पाहिजे. आपल्या आजच्या अज्ञानापोटी आपणच आपल्या समस्या निर्माण करून घेतल्या आहेत. आज प्रदूषण आणि ऊर्जासंकट यांचे प्रश्न कितीतरी जटील झाले आहेत. त्याकरिता या गोष्टींचे सांस्कृतिक मूळ काय आहे, हे शोधून त्याप्रमाणे वागावयास पाहिजे.

Leave a Comment