वाहने आणि वायूप्रदूषण

वायु प्रदूषण
वायु प्रदूषण

१. वाहनांमधून तसेच विद्युतनिर्मिती करणार्‍या केंद्रांमधूनही काजळीचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. हवा प्रदूषित करतात. हवेमधील काजळीच्या सूक्ष्म कणांच्या दीर्घकाळ संपर्कामध्ये आल्यास फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयाचे अन्य विकारसुद्धा जडण्याची शक्यता असते. – श्रीराम सिधये, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मार्च २००२

२. वाहनांमुळे होणारा प्रदूषणाचा प्रश्न तर जगभर भेडसावतच आहे आणि त्याचा सजीव अन् निर्जीव या दोहोंवर परिणाम होत आहे. कोलकाता येथे प्रदूषणामुळे भर दुपारी संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण असते आणि तासा-दोन तासांत कपडे मळतात.

३. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक शहरात वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे गंभीर वायूप्रदूषण झाले आहे. येथील मोठ्या रस्त्यांना लागून असलेल्या प्राथमिक शाळांतील मुलांच्या हिरड्यात आणि लघवीत शिसे साठलेले आढळून आले. – (दैनिक पुढारी, ३.६.१९९९)

४. ‘एक प्राध्यापक मित्र सांगत होते, न्यूयॉर्क, टोकीयो, लंडन अशा मोठ्या शहराची हवा, विलक्षण विषारी बनली आहे. माणूस सहन करू शकेल, यापेक्षा तीन पटीने अधिक विष वातावरणात आहे, तरीही माणूस जगतो. इतके विष अंगवळणी पडले आहे. सवयीने वळण पडले आहे, विष पचविण्याची त्याची क्षमता वाढली आहे. मुंबईच्या हवेतही दोनपट विष नक्कीच आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००८)

५. पेट्रोल आणि डिझेल यांच्या वापरामुळे वायू विषाक्त होणे : ‘तुम्ही गाड्या चालवता ? पेट्रोल आणि डिझेल यांच्या वापरामुळे वायू किती विषाक्त करता ? वास्तविक ‘हे विष कालवणारे हात तोडून टाकले पाहिजेत’, असे नाही का आपणाला वाटत ?’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)