स्वयंसूचना बनवतांना हे लक्षात घ्या !

बालमित्रांनो, स्वयंसूचना बनवतांना काही सूत्रे लक्षात घ्यावी लागतात. ती सूत्रे कोणती आहेत, हेबघूया.

१. सोपी वाक्यरचना

स्वयंसूचनेची वाक्यरचना सोपी, मोजक्या अन् योग्य शब्दांत असावी.‘स्वयंसूचना पद्धत ३ (प्रसंगाचा सराव)’ या पद्धतीमधील सूचना मात्र साधारणतः ८-१० ओळींची असावी.

२. सकारात्मक शब्द

सूचनेत ‘न, नाही, नको’ आदी नकारात्मक शब्दांचा वापर करू नये.

२ अ. अयोग्य सूचना :दूरचित्रवाणी बंद करून अभ्यासाला बस’, असे आईने सांगितल्यावर मीरागावणार नाही.

२ आ. योग्य सूचना : ‘दूरचित्रवाणी बंद करून अभ्यासाला बस’, असे आईने सांगितल्यावर मला रागयेत असेल, तेव्हा मला जाणीव होईल की, काही दिवसांनी परीक्षा चालू होणार असल्याने आई मला तसेसांगत आहे आणि मी शांतपणे दूरचित्रवाणी बंद करून अभ्यासाला बसेन.

३. सूचना वर्तमानकाळात असावी

सूचना भूतकाळात नसावी. ‘स्वयंसूचना पद्धत १’ आणि‘स्वयंसूचना पद्धत २’ या पद्धतींमधील सूचना वर्तमानकाळात, तर ‘स्वयंसूचना पद्धत ३’ या पद्धती मधील सूचना चालू वर्तमानकाळात असावी.

४. स्वतःविषयीचा उल्लेख

सूचनेत ‘मी, माझे, मला, माझ्या’ असा स्वतःविषयीचा उल्लेख करावा.‘आपले, आपण, आमच्या’ असे स्वतःविषयीचे उल्लेख करू नयेत.

५. सूचना प्रसंगानुरूप नेमकेपणाने बनवाव्यात

५ अ. अयोग्य सूचना : जेव्हा मी अव्यवस्थितपणे कृती करत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईलआणि मी व्यवस्थित कृती करीन.

५ आ. काही योग्य सूचना

१. जेव्हा मी दप्तरात वह्या आणि पुस्तके अव्यवस्थितपणे भरत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईलआणि मी एका बाजूला वह्या आणि दुसर्‍या बाजूला पुस्तके, असे व्यवस्थितपणे दप्तर भरीन.

२. मी चप्पल वेडीवाकडी काढून ठेवत असेन, तेव्हा मला ‘अव्यवस्थितपणा’ या दोषाची जाणीव होईलआणि मी चप्पल व्यवस्थित काढून ठेवीन.

६. दृष्टीकोन अंतर्भूत करणे

चूक पुन्हा होऊ नये, यासाठी मनाला योग्य दृष्टीकोन देणे आवश्यकअसते. यासाठी स्वयंसूचनेत योग्य दृष्टीकोन अंतर्भूत करणे उपयुक्त ठरते.

६ अ. सर्वसाधारण स्वयंसूचना : जेव्हा मी कपाटात कपडे चोळामोळा करून ठेवत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि मी कपडे घडी करून कपाटात व्यवस्थित ठेवीन.

६ आ. योग्य दृष्टीकोन असलेली स्वयंसूचना : जेव्हा मी कपाटात कपडे चोळामोळा करून ठेवत असेन, तेव्हा ‘मला आदर्श बालक बनायचे आहे’, याची जाणीव होईल आणि मी कपडे घडी करून कपाटात व्यवस्थित ठेवीन.

७. एक दोष घेऊन सूचना बनवावी

एका स्वयंसूचनेत एकच दोष अंतर्भूत करावा, उदा. विद्यार्थ्याने एखाद्या विषयाचा अभ्यास न करण्यामागे ‘एकाग्रतेचा अभाव’ आणि ‘अभ्यासाचे गांभीर्य नसणे’, हे दोन दोष असू शकतात. अशा वेळी सूचना बनवतांना तिच्यात या दोन दोषांपैकी एक दोष घेऊन सूचना बनवावी.

पालकांनो, मुलांना स्वयंसूचना बनवण्यात साहाय्य करा ! मुलांना अचूक स्वयंसूचना बनवण्याची सवय लागेपर्यंत त्यांना सूचना बनवण्यात साहाय्य करा !

स्वयंसूचनांच्या अधिक अभ्यासासाठी ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया’ हा ग्रंथ वाचा!

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दोष घालवा आणि गुण जोपासा !’