मराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. ‘पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य, असे आपले शब्द रूढ होत गेले.

२. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच !

३. मराठीत प्रचलीत झालेले परकीय शब्द :संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले व यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.

अ. पुढे पुढे आमची नावे व आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली.

आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.’

४. शिवसन्निध काळातील ‘मराठी’ पत्र : ‘शिवसन्निध काळातील शाही हुकुमनामे व अन्य पत्रव्यवहार वाचले, तर बुद्धी अवाक् होते. उदाहरणार्थ हे ‘मराठी’ पत्र पहा. ‘अजरख्तखाने शहाजीराजे दाम दौलतहु बजाने कारकुनानी व हवालदारांनी हाल व इस्तकबाल …वगैरा वगैरा.’ या पत्रातील काही शब्दच मराठी आहेत. पत्राचे व्याकरण, त्यातील मराठी प्रत्यय, कर्ता, कर्म, क्रियापद सुदैवाने अर्थ समजण्याइतपतच वापरले आहेत; म्हणून या पत्राला मराठी म्हणायचे का ?’

६. शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाल्यावर संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र व सिंहासन लाभणे :शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले, म्हणजे संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र व सिंहासन लाभले. तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालत होता. त्यामुळे दैनंदिन जीवनातूनच मराठी भाषा बहरत, फुलत गेली.’- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (कालनिर्णय दिनदर्शिका, डिसेंबर २००९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात