पर्यावरण

आपल्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण ! पर्यावरणाचा समतोल निसर्ग टिकवत असतो. माणसाचा पर्यावरणातील हस्तक्षेप आणि ढवळाढवळ वाढल्याने, तसेच त्याच्या स्वार्थी आणि नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणातील समतोल ढासळतो. मानवाचे स्वास्थ्य पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे !

पर्यावरण विस्कळीत झाल्यामुले मानवाला भोगावे लागणारे त्रास !

प्रदूषणामुळे पर्यावरण विस्कळीत झाले आहे. म्हणून प्रदूषण होण्याची कारणे पाहू. निसर्गातील पंचमहाभूतांमध्ये (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांत) ढवळाढवळ करून संतुलन बिघडले की, शारीरिक प्रदूषण होते, स्वभावदोष अन् अहं यामुळे मानसिक प्रदूषण होते, तर दुर्जन शक्तीमुळे आध्यात्मिक प्रदूषण होते.

शारीरिक

अ. शरीराची क्षमता कमी होणे : जिवावर पर्यावरण आणि पर्यावरणावर जीव अवलंबून असतो. दोघांपैकी एकाचा तोल बिघडला, तर त्याचा परिणाम पूर्ण सृष्टीचक्रावर होतो.

आ. आयुर्वेदिक औषधी लुप्त होणे : सध्याच्या काळात पर्यावरणात तमकणांचे प्रमाण वाढल्यामुळे तमोगुणाशी निगडित झाडांची उत्पत्ती जास्त प्रमाणात झाली व सत्त्वकणांशी निगडित झाडांची उत्पत्ती कमी होत-होत १० टक्क्यांवर आली. आयुर्वेदासाठी लागणार्‍या औषधी सत्त्वगुणांशी निगडित असल्यामुळे त्यांची उत्पत्ती पर्यावरण दूषित झाल्यामुळे कमी झाली. त्यामुळे योग्य उपचार करणे अशक्यच झाले आणि जिवाची क्षमता कमी झाली.

इ. जिवाच्या पंचतत्त्वाशी निगडित कर्मेंद्रियांची क्षमता कमी होणे : पंचतत्त्वात तमोगुण वाढला आहे, म्हणजे पंचतत्त्व क्षीण झाले आहे त्यामुळे सध्याच्या काळात पंचतत्त्वात तमोगुणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमकुवत देह असलेल्या किंवा रोगी जिवांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढलेले आहे.

मानसिक

जिवाची पर्यावरणाशी एकरूपता साध्य न झाल्यामुळे मनोमयकोषात असलेल्या रज-तम कणांचे प्रमाण वाढणे, जिवाचा उत्साह कमी होणे, जडत्व वाढल्यामुळे जिवाद्वारे रज-तमाच्या अधीन होऊन अनिच्छेने कार्य होणे, जिवाची सहज कृतीही काही अंशी निसर्गाच्या विरोधात असल्यामुळे जिवाच्या मनोमयकोषात प्रत्येक वेळी ताण निर्माण होण्, असे मानसिक दुष्परिणाम झाले आहेत.