वृक्ष आणि जंगलतोड

रविवारचा न्यूयार्क टाईम्स १५० पानी असतो. ते एक वर्तमानपत्र म्हणजे चार वृक्ष ! जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. ज्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत.

अ. परिणाम

१. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. – प.पू. परशराम माधव पांडे महाराज

२. ज्या प्रमाणात तोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा र्‍हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगरमाथेही उजाड होत आहेत अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे.

३. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.

आ. जंगलाची उपयुक्तता

१. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू हवेत सोडतात.

२. अनेक झाडे ओझोनचेही प्रमाण वाढवण्यास मदत करतात.

३. दुर्मिळ प्राणी, वनौषधी यांचे जतन जंगलामुळेच होत असते.

४. घनदाट जंगलामुळे हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो.

५. पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन् भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते.

६. खोलवर रुजलेल्या मुळांच्या साहाय्याने जमिनीची धूप थांबवली जाते अन् जमिनीची सुपिकता कायम रहाते.

आ. १. वृक्षाचे कार्य

  • प्राणवायू (ऑक्सिजन) उत्पादन
  • हवेचे प्रदूषण थांबवणे
  • भूमीची फलद्रूपता टिकवणे आणि भूमीची धूप थांबवणे
  • भूगर्भ पाण्याची पातळी उंचावणे आणि हवेत आर्द्रता टिकवणे
  • पशूपक्षी यांचे आश्रयस्थान
  • प्रथिनांत (प्रोटीनमध्ये) रूपांतर करणे

इ. सद्यस्थिती

१. ‘एक वृक्ष तोडल्याने १७ लाख रुपयांचा तोटा होतो. महापालिका मात्र वृक्ष तोडणार्‍यास १०० ते १००० रुपये दंड आकारते.

२. वृक्षारोपण केलेली ७०-८० टक्के झाडे मरतात. – ( दादूमिया, धर्मभास्कर.)

उ. उपाय

१. जंगलतोड तर थांबलीच पाहिजे; पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत. त्यांची योग्य निगा राखून ती योग्य प्रकारे वाढतील याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षारोपण करा, तसेच वृक्षांचे रक्षण करा. तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल, तर घराच्या परिसरात कडुलिंब, पिंपळ, तुळस इत्यादी झाडे अवश्य लावा. तसेच गायही पाळा. त्यामुळे आपले घर आरोग्यशाळा बनेल.’ – (गीता स्वाध्याय)

२. कोणत्याही कारणासाठी शुभेच्छा देतांना एक झाड भेट द्या.

३. क्रांतीविरांचे स्मरण, स्वजनांचे प्रेम, देशभक्तांचा अभिमान, विद्वानांचा आदर व्यक्त करायला त्यांची स्मृती टिकवण्यासाठी इस्त्रायलने झाडे लावली आणि जोपासना केली. इस्त्रायलमध्ये आज ६०० पेक्षा अधिक दाट जंगले आहेत. ११ अब्जाहून अधिक वृक्ष आहेत. त्यांच्या शहीद वनात ६० लक्ष वृक्ष आहेत. अशी स्मृतीवृक्षांची छाया सर्व देशभर आहे.’

– (घनगर्जित, सप्टेंबर २००८)