नैसर्गिक आपत्तींची कारणे

‘जशास तसे’ हा निसर्गाचा शाश्वत नियम असणे'

‘जशास तसे’ हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. नास्तिक, धर्माचरण न करणार्‍या मानवी पशूची क्रूरताच निसर्गाला सूड घ्यायला भाग पडते. ‘झाडांचे गोपनीय जीवन’ हापीटर टोम्पकिन्सआणिक्रिस्टोफर बर्डया शास्त्रज्ञांचा ग्रंथ त्या नियमांचे अत्युत्तम विश्लेषण करून ते सिद्ध करतो.

निसर्ग सूड उगवत आहे !

‘निसर्गाचा गळा दाबून त्याला रहस्ये ओकायला भाग पाडणारे शास्त्रज्ञ हे स्वार्थासाठी मनमानी विध्वंस करणारे धर्महीन आधुनिक राक्षस आहेत. आज निसर्ग सूड उगवत आहे. मानव हा निसर्गाचा एक अविभाज्य अंश असल्याने त्याला निसर्गावर आक्रमण करणे असंभव आहे.

क्रौर्य, आसुरी वृत्ती, कत्तलखाने, हत्याकांड आणि युद्धे
यांचा भूकंपाशी अती निकटचा संबंध असणे

क्रौर्य, आसुरी वृत्ती, कत्तलखाने, हत्याकांड आणि युद्धे यांचा भूकंपाशी अती निकटचा संबंध आहे. हे क्रौर्य, हे कत्तलखाने बंद करा, म्हणजे भूकंप व्हायचे नाहीत.’ आईनस्टाईनची `पिडा तरंग’ थिअरी तसाच निष्कर्ष सांगते. `इटिमॉलॉजी ऑफ अर्थक्वेक्स’ हा ग्रंथही तेच निष्कर्ष देतो. पवित्र भारतभूमीला सहस्त्रशः वर्षांपासून भूकंप ठाऊक नाहीत. क्वचित अपवाद असेल; परंतु या दहा वर्षांत चार प्रलयकारी भूकंप, चार चक्रीवादळे आणि सहा महापूर भारतभूमीने पहिले. – प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)