लोकसंख्येची वाढ

शहरांमधील लोकसंख्येची वाढ पर्यावरणास हानीकारक ! :

‘गेल्या दहा वर्षांत शहरी भागातील लोकसंख्येची घनता झपाट्याने वाढत असून त्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरांकडे येणार्‍या
वाढत्या लोंढ्याच्या गरजा भागवण्यासाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे आणि पर्यावरणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागले आहे. त्यामुळे थोड्या दिवसांतच हा प्रश्न उग्र स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (महाराष्ट्र टाईम्स, १०.४.२००१)

शहरे :

खेड्यांचे शहरीकरण फार वेगाने होत असल्याने सुविधांच्या नावाखाली हिरवाई कमी होत आहे आणि क्राँकीटची जंगले वाढत आहेत. शहरात रहाणारे चिमण्या, कावळे अन् कबुतरांसारखे पक्षी, शेतात सापडणारे बिनविषारी साप, बेडूक यांचे प्रमाण कमी झाले आहे. खारफुटीच्या जंगलांची तोड होत असल्याने खाडीच्या भागात स्थलांतरीत होणारे अनेक पक्षी आज येतांना दिसत नाहीत. वेगाने होत असलेल्या वाळूच्या उपशामुळे खाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे़.