पाणी प्रदूषित करू नका

‘पाणी कधीच केव्हाही प्रदूषित होऊ देऊ नका’, असे धर्मशास्त्र सांगते. पाणी हे नारायणाचे आहे. म्हणूनच नद्यांचे पावित्र्य भारतियांच्या नसानसांतून वहाते आहे. नद्यांत स्नान करतांना साबण लावून आंघोळ करणे वर्ज्य आहे. नदीमध्ये गुळणी टाकणेही वर्ज्य आहे. इतकी दक्षता घेतली जाते. ते पाणीच जर प्रदूषित झाले तर… ? पाणी प्रदूषित करणार्‍याला गोहत्येचे पातक लागणे : स्मृतिकार सांगतात, ‘पाणी प्रदूषित झाले, तर जीवनच संपुष्टात येईल. पाणी प्रदूषित करणारा महापापी होत. जो पाण्यात विष्ठामूत्र सोडतो, सांडपाणी टाकतो आणि गावची गटारगंगा सोडतो, तो अनेक पातकांनी लिप्त होतो. त्याला गोहत्येचे पातक ग्रासते.’

Leave a Comment