भूमीवंदन

‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।

अर्थ : समुद्ररूपी वस्त्र धारण करणार्‍या, पर्वतरूपी स्तन असणार्‍या आणि भगवान श्रीविष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, मी तुला नमस्कार करतो. तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे, त्यासाठी तू मला क्षमा कर.

Leave a Comment