केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

केरळ राज्यातील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’ (अमली पदार्थांचे व्यसन लावून मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणे) यांच्या जाळ्यात अडकत आहेत. शस्त्रांचा वापर न करता धर्मांध तरुण इतर धर्मांतील तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’ यांसारख्या मार्गांचा वापर केला जात आहे, असा दावा बिशप (चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेले पाद्री) मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी केला आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’ला लगाम घालणारा कायदा आणि त्याची उपयुक्तता !

आज उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याने हिंदूंना मिळालेला थोडा दिलासा उर्वरित कोट्यवधी हिंदूंनाही मिळावा, यासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा देशभरात लागू करावा ! Read more »

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

इंदूर येथे फैजान खान याने ‘कबीर’ हे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची ध्वनीचित्रफीत बनवली. ही ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन या धर्मांधाने त्या महिलेवर ४ वर्षे लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी फैजान खान याला अटक केली असून त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. Read more »

हिंदु नाव धारण करून ५१ वर्षांच्या धर्मांधाकडून २२ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह !

सूरत येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यासाठी तिचा छळ केला. तिच्यावर धर्मांतर करण्यासाठीही दबाव आणण्यात आला. Read more »

‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘द कन्व्हर्जन’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बनवण्यात आलेल्या ‘द कन्व्हर्जन’ (धर्मांतर) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर गेल्या २४ घंट्यांमध्ये १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा चित्रपट येत्या सप्टेंबर मासामध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी आणि ‘नॉस्ट्रम एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. Read more »

‘लव्ह’ म्हणजे फसवे प्रेम आणि ‘जिहाद’ म्हणजे जगावर इस्लामी राज्य प्रस्थापित करणे होय ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ आयोजित करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक युवक आणि युवती यांनी घेतला. Read more »

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन !

कडब येथील एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी गावातील एक धर्मांध युवकही गावातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसह पळून गेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. Read more »

बागपत (उत्तरप्रदेश) मध्ये हिंदु असल्याचे भासवून लव्ह जिहाद !

बागपत धर्मांध युवकाने स्वत: हिंदु असल्याचे भासवून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि नातेवाइकांसमवेत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. Read more »

धर्म लपवून हिंदु युवतीशी लग्न करणार्‍या धर्मांधाला अटक

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका हिंदु युवतीला तिच्या भावाच्या साहाय्याने मध्यप्रदेश पोलिसांनी कह्यात घेतले. धर्मांधाने त्याचा धर्म लपवून युवतीशी लग्न केले होते. युवतीची साक्ष नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. Read more »

हिंदु युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदु युवतीला बुरखा घालून येथील न्यायालयात नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दिलशाद सिद्दिकी या धर्मांधाला लोकांनी पकडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु पोलिसांनी युवतीला सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलशादला अटक केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​