Menu Close

(म्‍हणे) ‘गावात घुसणार्‍या अन्‍वेषण यंत्रणेच्‍या अधिकार्‍यांचे हात-पाय तोडा !’

हरियाणात धर्मांध मुसलमानाचा चिथावणीखोर व्‍हिडिओ प्रसारित !

भाजपच्‍या राज्‍यात अशी चिथावणीखोर विधाने उघडपणे केली जातात आणि पोलीस संबंधितांवर कारवाई करत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

फरीदाबाद (हरियाणा) – येथे सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झालेल्‍या एका व्‍हिडिओत एक व्‍यक्‍ती पोलिसांचे हात-पाय तोडण्‍याविषयी लोकांना चिथावणी देत असल्‍याचे दिसत आहे. चिथावणी देणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव जाबिर घाटमिका असून तो हरियाणातील नूंह येथील रहिवासी असल्‍याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

यात जाबिर म्‍हणतो की, मी जनतेला सांगतो की, जर साध्‍या वेशातील केंद्रीय अन्‍वेषण अधिकारी पूर्वकल्‍पना न देता गावामध्‍ये घुसत असतील, तर तुम्‍ही शांत न बसता त्‍यांचे हात पाय तोडून टाकावेत; कारण स्‍वसंरक्षणाचा अधिकार राज्‍यघटनेने दिला आहे. कुणी नंतर विचारले, तर सांगू शकता की, ते गुंड समजून आम्‍ही त्‍यांना मारले. कुणाच्‍या कपाळावर लिहिलेले नसते की, ते कोण आहेत ?

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *