Menu Close

महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील घटना

एरव्ही हिंदूंच्या साधू-संतांवर केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांवरून आकाशपाताळ एक करून हिंदु धर्मावरच चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

पाद्री फ्रांसिस फर्नांडिस अटक

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील चर्चशी संबंधित महाविद्यालयातील पाद्री फ्रांसिस फर्नांडिस याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केल्यानंतर त्याला न्यायालयात उपस्थित केल्यानंतर  १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पादरी फर्नांडिसच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी बजरंग दलच्या हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *