Menu Close

अमरावती (महाराष्ट्र) भागात बकरी ईदला जागो-जागी गोवंशियांची हत्‍या

३ गुन्‍हे नोंद

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अमरावती (महाराष्ट्र) – गुरुवारी बकरी ईदच्‍या दिवशी शहरात अनेक ठिकाणी गोवंशियांची कुर्बानीच्‍या नावाखाली हत्‍या करण्‍यात आली. बडनेरा पोलीस हद्दीतील चमननगर, नागपुरी गेट पोलीस हद्दीतील ताजनगर आणि ताजनगर क्रमांक २ येथे गोवंशिची कुर्बानी दिल्‍याचे उघड झाल्‍याने पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्‍ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्‍यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्‍वये गुन्‍हे नोंद केले आहेत.

एका आरोपीने गोवंशियांचे मुंडके, मास रस्‍त्‍यावर फेकून दिले होते. दुसर्‍या घटनेत आरोपी अहेमद बेग उस्‍मान बेग याने त्‍याच्‍या घरात गोवंशियाची कत्तल केली. येथून पोलिसांनी ३० सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. ताजनगर क्र. २ येथे मोहम्‍मद इकबाल मोहम्‍मद फारूक याला अडीच वर्षीय गोर्‍ह्याचे तोंड, हात-पाय दोरीने बांधून कापतांना रंगेहात पकडले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *