Menu Close

पुणे (महाराष्ट्र) येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !

  • पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
  • आधी थडगी बांधणे, त्याच्यावर चादर चढवणे, नंतर थडग्याच्या भोवती संरक्षक भिंत बांधणे हे धर्मांधांच्या लँड जिहादचे वेगवेगळे टप्पे असतात, हे लक्षात घ्या ! अवैध बांधकामांकडे कानाडोळा करणार्‍या संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! -संपादक

पुणे – येथे ऐतिहासिक ओळख असलेल्या पर्वती टेकडीवर मुसलमानांनी अवैध मजार बांधल्याचे समोर आले आहे. या टेकडीवर पुणेकरांची पुष्कळ वर्दळ असते. अशा प्रकारे ‘या टेकडीवर मजार बांधून मुसलमान येथील जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षातही तेथे आता मुसलमान नमाजपठण करण्यासाठी गर्दी करत आहेत. काही जागरूक नागरिकांनी हा प्रकार समाजमाध्यमांद्वारे उघडकीस आणला.

सौजन्य टीव्ही 9 मराठी 

१. टेकडीवर असलेल्या मोकळ्या जागेतच ही मजार बांधण्यात आली आहे. मजारीभोवती ओट्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली.

२. आमदार मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली.

३. भाजपचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनीही यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याच विषयासंदर्भात ६ जून या दिवशी दोन विभागांच्या अधिकार्‍यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे.

४. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे यांनी सांगितले की, आम्हाला याविषयी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची पडताळणी करत आहोत. ही मजार जुनी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.  सर्व संबंधित विभागांच्या नोंदींनुसार वस्तूस्थिती पडताळून पाहिली जाईल. लगेच कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही.

पर्वती टेकडीची वैशिष्ट्ये

पर्वती टेकडी आणि त्यावरील मंदिरे, तसेच तेथे असलेले पेशव्यांचे वस्तूसंग्रहालय ही पुणे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्‍वर मंदिर बांधून घेतले. यासह तेथे कार्तिकेय, विष्णु, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी देवतांची मंदिरेही आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *