Menu Close

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

  • वासनांध मुसलमान !

  • महिलेने कापले उस्मानचे लिंग

(प्रतिकात्मक चित्र)

गौहत्ती – आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली. उस्मान याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

१. भुरागावचे पोलीस प्रभारी हेमंत बोरगोहेन यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. घायाळ उस्मानला गौहत्ती येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

२. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे उस्मानच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

३. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला मूल नव्हते. ही समस्या घेऊन ती उस्मानकडे जात असे.

४. उस्मान भूतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. या वेळी उस्मानने त्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करत महिलेने उस्मानचे लिंग कापले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *