Menu Close

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद

  • आरोपीचे नाव घोषित करण्यास नकार

अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे औराई गावामध्ये फडकावण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा दाखवण्यात आला. यासह या ध्वजाच्या शेजारी एक हिरव्या रंगाचा ध्वजही फडकावण्यात आला. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तिरंगा ध्वज उतरवून गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव घोषित केलेले नाही, तसेच प्रसारमाध्यमांनाही ‘ते घोषित करू नये’, असे सांगितले. या घटनेमागे माजी सरपंच महंमद इस्रायल असल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रामसूरत राय यांनी  केला आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *