Menu Close

मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये काश्मीरविषयी आपेक्षार्ह प्रश्‍न विचारणार्‍या प्राध्यापकावर कारवाई

 

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ‘काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला पाहिजे का ?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. ही प्रश्‍नपत्रिका बनवणार्‍या प्राध्यापकावर मध्यप्रदेश सरकारने कारवाई केली आहे.

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करून ‘संबंधितांना यापुढे प्रश्‍नपत्रिका बनवण्याचे दायित्व देण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे. तसेच या प्राध्यपकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वरील प्रश्‍नावर दोन पर्याय देण्यात आले होते. पहिल्या पर्यायामध्ये ‘यामुळे भारताचे पैसे वाचतील’, तर दुसर्‍यामध्ये ‘अशा निर्णयामुळे अशा प्रकारच्या अन्य मागण्या वाढतील’, असे म्हटले होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *