Menu Close

देहलीच्या शाहीन बागमधून ५० किलो हेरॉईन जप्त

नवी देहली – केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पथकाने येथील शाहीन बाग परिसरातून ५० किलो हेरॉईन, ३० लाख रुपये रोख आणि ४७ किलो अन्य अमली पदार्थ जप्त केले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात ४०० कोटी रुपये इतकी किंमत आहे.

हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *