Menu Close

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

बारामुला (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर युसूफ कांतरू आणि अन्य १ आतंकवादी यांना ठार केले आहे. या चकमकीत ३ सैनिक, तर एक नागरिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पेरिसवानी भागात ही चकमक उडाली. या घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *