Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्‍वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर (तेलंगाणा) – शहरातील एका पशुवधगृहाला गाय विकल्याच्या आरोपावरून डबीरपुरा पोलिसांनी कोमटवाडी येथील पोचम्मा मंदिराचे अध्यक्ष डी. प्रेम कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ‘अखिल भारत गौ सेवा फाऊंडेशन’चे प्रतिनिधी ए. बालाकृष्णा यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. मंदिर समिती सदस्य एडला महेंद्र यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सौजन्य शार्प न्युज

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *