Menu Close

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

ट्विटर आणि फेसबूक यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, तसेच भारतविरोधी विचारांचा प्रसार करणे आदी गोष्टी केल्या जातात. अशा सामाजिक माध्यमांवर भारतात कधी बंदी घातली जाणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर रशियाने आता सामाजिक माध्यमे असणार्‍या ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांच्यावर बंदी घातली आहे. रशियाने या दोन्ही संकेतस्थळांना ‘आतंकवादी संघटना’ घोषित करत ही बंदी घातली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *