Menu Close

तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर – तेलंगाणातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचा नेता साजिद खान याने एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना २७ फेब्रुवारीला उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर साजिद खान फरार झाला आहे, तर त्याच्या दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. खान हा निर्मल जिल्ह्यातील एका नगरपालिका परिषदेचा उपाध्यक्ष आहे. आरोपी महिलेने पीडित मुलीला कार्यक्रमाला नेण्याच्या बहाण्याने भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेले. तेथे तिला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तेथेच खान याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची तब्येत बिघडल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. या घटनेची माहिती बाल कल्याण समितीने पोलिसांना दिली. खान याला अटक करण्यासाठी पोलिसांची ४ पथके सिद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी दिली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *