Menu Close

काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांकडून महिलेवर बलात्कार !

वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

पालघर – नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख यांना अटक केली आहे. दोन धर्मांधांनी पीडित २० वर्षीय महिलेला तिच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे, असे सांगून ती उतरवण्याचे आश्वासन दिले होते. अडचणीमध्ये असल्याने या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर आरोपींनी तिच्या घरात प्रवेश करून काळी जादू उतरवत असल्याचे सांगून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन ते फरार झाले. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *