Menu Close

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील पाकप्रेमी राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यावर काही बोलतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

श्रीनगर – पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जम्मू-कश्मीर नॅशनल इंडिपेंडेंस अलायंस’चे अध्यक्ष महमूद कश्मिरी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करतांना, ‘काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकिस्तानचा हात आहे’, असे म्हटले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
काश्मिरी म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक गुलाम आहेत. त्यांना बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही. पाकच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. अशीच स्थिती बलुचिस्तानमध्येही आहे. पाकमधील लोकांची हीच समस्या आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *