Menu Close

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

टीप : मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता

‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

कर्णावती (गुजरात) – येथे २५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण दोघा मौलवींची नावे समोर आली आहेत. मुंबईच्या मौलवीने हत्येचा आदेश दिला होता, तर कर्णावतीच्या मौलवीने आरोपींना शस्त्र पुरवले होते. कर्णावतीच्या मौलवीला अटक करण्यात आली आहे. किशन यांनी सामाजिक माध्यमांमध्ये महंमद पैगंबर यांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावरून त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी किशन बोलिया यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना संघवी म्हणाले की, आम्ही किशन यांच्या कुटुंबाला न्याय दिल्याविना रहाणार नाही. किशन यांची हत्या करण्यास २० वर्षांच्या दोघा आरोपींना मौलवीने प्रेरित केले होते. मौलवींचे काम लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे असते; मात्र त्यांनी हत्येसाठी शस्त्र पुरवली, हे आश्‍चर्यकारक आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *