Menu Close

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली शस्त्र नसलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची पूजा !

  • यातून ‘हिंदूंनी नेहमीच शस्त्रविहीन असायला हवे’, असे संदेश ममता बॅनर्जी देत आहेत का ?
  • हिंदूंच्या बहुतेक देवतांच्या हातात शस्त्रे असतात, ते शस्त्रधारी असतात, असे असतांना त्यांच्या हातात शस्त्रे न दाखवणे, हा एक मोठ्या षड्यंत्राचाच भाग आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन अशा मूर्तीशास्त्रविरोधी मूर्तींना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !  

कोलकाता (बंगाल) : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदूंचे लांगूलचालन करण्याचा सध्या प्रयत्न चालू केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या मंडळांना आर्थिक साहाय्य घोषित केले आहे; मात्र त्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने प्रश्‍न विचारले आहेत. दुसरीकडे १७ ऑक्टोबरपासून नवरारत्रोत्सव प्रारंभ झाला आहे. ममता बॅनर्जी या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची पूजा करत असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ममता बॅनर्जी श्री दुर्गादेवच्या ज्या मूर्तींची पूजा करत आहेत, त्यातील एकाही मूर्तीच्या एकाही हातात शस्त्र नसल्याचे दिसत आहे. मुळात देवीच्या हातांमध्ये शस्त्र असतात. ती शस्त्रधारी देवी आहे. (हा ममता बॅनर्जी यांचा पराकोटीचा हिंदुद्वेषच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Anti Hindus

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *