Menu Close

तिघा धर्मांधांकडून १४ वर्षांच्या मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार

  • अश्‍लील चित्रीकरण करून ब्लॅकमेल करत बलात्कार
  • अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकांत बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

भोपाळ (मध्यप्रदेश) : येथे एका अल्पवयीन मुलीवर तिघा धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. फुजैल, रिजवान आणि फरहान अशी या तिघांची नावे आहेत. ही १४ वर्षांची मुलगी ऑनलाईन खेळ असणार्‍या ‘पबजी’च्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांनी या मुलीला भेटण्यास बोलावले होते. नंतर तिच्यावर बलात्कार केला. याचे चित्रीकरण करून नंतर तिला ‘ब्लॅकमेल’ करून एका मासामध्ये अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. याविषयी तिने आईला काहीच सांगितले नाही; मात्र आईला संशय आल्याने चौकशी केल्यावर तिने ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *